विवेकानंद आणि दाऊद तुलनेने गडकरी अडचणीत

त भोपाळ: भारतीय तत्वज्ञानाची ध्वजा साता समुद्रापार पोहोचविणारे स्वामी विवेकानंद आणि कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहीम यांच्यावर तुलनात्मक विधान करून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आणखी एक वाद आपल्या अंगावर ओढून घेतला आहे. या निमित्ताने त्यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी काँग्रेसने अचूक साधली आहे; तर आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले आहे.
महिलांच्या ओजस्विनी या नियतकालिकाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी स्वामी विवेकानंद आणि दाऊद यांचा बुध्यांक सारखाच असल्याचे विधान केले. अर्थात त्यापुढे त्यांनी; ‘या दोघांच्या आयुष्याच्या दिशा भिन्न होत्या. एकाने आपली बुद्धी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी वापरली; तर दुसर्याने तिचा वापर करून गुन्हेगारी साम्राज्य उभे केले;’ असेही सांगितले.
मात्र आधीच ‘पूर्ती ‘ घोटाळ्याच्या आरोपांनी अडथळ्यांना तोंड देत असलेल्या गडकरींना या तुलनेचे निमित्त साधून आणखी घायाळ करण्याची संधी अर्थातच काँग्रेसने गमावली नाही.

Leave a Comment