बॉलिवुडमधील स्टार मंडळी बीजी

बॉलिवुड मधील स्टार मंडळी कुठल्याही बाबतीत मागे राहत नाहीत, सण असो की कुठला ही कार्यक्रम ही मंडळी न विसरता साजरा करतात. एवढेच नव्हे तर पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा करवा चौथचे व्रत देखील सैफीना पासून ते अभि-ऐश, अक्की-ट्विंकल, शिल्पा-राज आणि रवीना-अनिल हे सर्व सिलेब्रिटी कपल्स हा सण जोरात सेलिब्रेट करीत आहेत.

तसे पहिले तर हे इंडस्ट्रीजमधील स्टार मंडळी ग्लैमरस आणि मॉडर्न विचाराची, मात्र ज्यावेळी परंपरेची वेळ येते त्यावेळी ती आपल्या पतिच्या वयोमानासाठी करवा चौथचे व्रत देखील करतात. काही दिवसापूर्वीच सैफ अली खान सोबत लग्न केलेली करीना कपूर सुद्धा करवाचौथ करीत आहे. त्यामुळेच इतर स्टार वाइफ्स देखील यामुळे खूपच एक्साइटेड दिसतात.

करवाचौथचे व्रत यावेळी शिल्पा शेट्टी साठी खूपच खास आहे. हज़्बंड राज कुंद्रासाठी ती खूप एक्साइटेड आहे. बॉलिवुड मध्ये करवा चौथ व्रताला ग्लैमराइज करण्यात बच्चन फैमिलीचा मोठा हात आहे. बिग बी अमिताभ बच्चन आपली वाइफ जया बच्चनसाठी हे व्रत धरतात. तर अभिषेक बच्चनने या ट्रडिशनला फॉलो केले असून तो ऐश्वर्यासाठी उपवास करतो. करवाचौथ ऐशच्या बर्थडे नंतर दुस-याच दिवशी आहे. त्यामुळे अभिषेक बच्चन शिकागो मध्ये सुरु असलेल्या ‘धूम 3’ सिनेमाच्या शूटच्या कामातून वेळ काढून मुंबईला आला आहे. तो ऐशचा बर्थडे आणि करवा चौथ हे सेलिब्रेट करूनच परतणार असल्याचे समजते. बिग बी अमिताभ बच्चनने देखील केबीसीच्या शूटिंगला एक दिवस ऑफ दिला आहे. ऐशच्या बर्थडे साठी एकत्रित आलेली बच्चन फैमिली हे व्रत एकत्रित साजरा करणार आहे. या त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये फैमिलीचे क्लोज फ्रेंड्स असलेले गोल्डी बहल आणि सोनाली बेंद्रे पण सहभागी होणार आहेत.

ऐक्ट्रेस रवीना टंडन देखील यादिवशी नववधूसारखा मेकअप करनार आहे, तर अभिनेत्री ट्विंकल खन्ना अक्षयकुमारसाठी करवाचौथ व्रत करीत आहे. राजेश खन्नाच्या निधनामुळे त्यांच्या घरी मोठे सेलिब्रेशन यावेळी करण्यात येणार नाही.

Leave a Comment