अनुष्काला आवडतो आर्मी ऑफिसर

इंडस्ट्रीजमध्ये कधी कुणाला काय आवडेल हे सांगणे कठीण आहे. आता आपल्या अनुष्का शर्माचे घ्याना तिला गेल्या काही दिवसापासून आर्मी ऑफिसर आवडू लागला आहे. सर्वाना वाटत होते की अनुष्का ‘जब तक हे जान’ या सिनेमात शाहरुख खानने आर्मी ऑफिसरची भूमिका केली असल्याने तिला आर्मी ऑफिसर आवडत असेल.

मात्र खरी कथा वेगळीच आहे, अनुष्काचे वडील आर्मी मध्ये कर्नल होते. तर तिचा मोठा भाऊ नौसेना मध्ये आर्मी ऑफिसर आहे. तिचे लहनपण हे एका आर्मी फैमिली व्यतीत झाले आहे. त्यामुळे अनुष्काच्या जीवन हे त्याप्रमाणे शिस्तबद्ध आहे. त्यामुळे तिला आर्मी ऑफिसर बद्दल नेहमीच गर्व वाटतो.

अनुष्का शर्मा आगामी काळात येत असलेल्या ‘जब तक हे जान’ या सिनेमात आर्मी ऑफिसरचा रोल करीत असलेल्या कुटुंबातील एक सदस्य आहे. या सिनेमात ती आर्मी ऑफिसर सोबत रोमांस करताना दिसणार आहे. हा आर्मी ऑफिसर दुसरा कोण नसून किंग खान म्हणजेच शाहरुख खान आहे. या सिनेमात या दोघांवर अनेक रोमांटिक सीन शूट करण्यात आले आहेत. या सिनेमाचे शूट कश्मीर मध्ये झाले आहे. हा सिनेमा दिवाळीत रिलीज होणार आहे. त्यामुळे या सिनेमाबाबत सर्वांची उत्सुकता वाढली आहे.