लंडन दि.१ – ब्रिटनचा सर्वात मोठा आणि जगभर प्रसिद्ध असलेला पोलिस फोर्स म्हणून ओळखला जात असलेल्या स्कॉयलंड यार्डचे मध्य लंडनमधील मुख्यालय विक्रीला काढण्यात येत असल्याचे वृत्त आहे. बजेटमध्ये सुमारे ५०० दशलक्ष पौंडाची कपात करण्यात आल्याने हा निर्णय घेणे भाग पडले असल्याचेही सांगण्यात येत आहे. मेट्रोपोलिटन पोलिसांनीच ही आश्वर्चकारक घोषणा केली आहे.
विक्रीला निघणार न्यू स्कॉटलंड लार्ड कार्यालय
लंडनच्या मध्यवस्तीत गेली पन्नास वर्षे लँडमार्क म्हणून स्कॉडलंड यार्डचे हे कार्यालय जगभर ओळखले जाते. यार्डातील वरीष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार आम्ही हे कार्यालय जवळच असलेल्या कोपर्यावरील इमारतीत हलविले तर आम्ही ६.५ दशलक्ष पौंडाची बचत करू शकणार आहे. यंदा पोलिस दलासाठी असलेले बजेटच कमी असल्याने लंडनमधील डझनाच्या संख्येने पोलिस ठाणी बंद करावी लागणार आहेत. इमारतीही खाली कराव्या लागणार आहेत.
मेट्रोपोलिटन पोलिस फेडरेशनचे अध्यक्ष जॉन टूली यांच्या मते मात्र स्कॉटलंड यार्ड कार्यालयाची जागा विकणे म्हणजे राजाच्या मुकुटातला मौल्यवान हिरा विकण्यासारखे आहे. हे कार्यालय विक्रीची वेळ प्रत्यक्षात येऊ नये कारण ते फार वेदनादायी असेल असेही ते म्हणाले.
