अफगाणिस्तान अध्यक्ष निवडणूकींत तालिबानींनाही संधी

काबूल दि.१ – अफगाणिस्तानात ५ एप्रिल २०१४ साली होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकींत तालिबानी उमेदवारही अर्ज भरू शकणार असल्याचे देशाचे वरीष्ठ निवडणूक अधिकारी फझील अहमद मनवी यांनी जाहीर केले आहे. सध्याचे अध्यक्ष हमीद करझाई हे अध्यक्षपदाची दुसरी टर्म भोगत आहेत मात्र आता घटनेनुसार त्यांना परत उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.अफगाणिस्तान गेली कित्येक वर्षे युद्धाच्या खाईत जळत आहे. मात्र करझाई यांच्या जागी अद्यापी तरी कोणताही दुसरा नेता समोर आलेला नाही. कोणताही नेता अफगाणिस्तानातून नोटो फौजा बाहेर पडल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. त्यामुळे कोणताही नेता सध्याच्या परिस्थितीत अफगाणिस्तानला शांतता आणि स्थिरता कितपत देऊ शकेल याची शंका आहे असेही फझील यांनी सांगितले.

फझील म्हणाले की निवडणूक आयोग म्हणून आम्ही निपःक्षपातीपणेच काम करणार आहोत. त्यामुळे सशस्त्र तालिबानी अथवा हब्ज ई इस्लामी संघटनांनाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेण्याची संधी दिली जाणार आहे. ते मतदार आणि उमेदवार म्हणून निवडणुकींत सहभागी होऊ शकतात. त्यात भेदभाव करता येणार नाही.

हब्ज ई इस्लामी ही माजी पंतप्रधान गुलबुद्दीन हिकमतयार यांच्याच पक्षाचा एक भाग आहे असे समजते.

Leave a Comment