मी चौकशीला तयार; वधरांचे काय?- गडकरी

मुंबई: कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. मात्र रोबर्ट वधरा यांचे काय करणार ते सरकारने सांगावे; असे आव्हान भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिले.

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या वावटळीत अडकलेल्या गडकरींच्या स्वगातासाठे विमानतळावर उपस्थित राहून भाजप कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करीत आपण आणि पक्ष गडकरींच्या पाठीशी असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना; आम्ही कोणाला घाबरत नाही. ईट का जबाब पत्थरसे देंगे; अशी आक्रमक भाषा वापरली. काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे; यासाठीच आपल्यावर आरोप केले जात असून आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत; असे गडकरी यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, भाजपचे राज्यसभा सदस्य अजय संचेती यांच्याशी आपले व्यावसायिक हितसंबंध असल्याचाही त्यांनी इन्कार केला.

Leave a Comment