गेली दहा वर्षे चीनच्या पंतप्रधानपदी आरूढ असलेले आणि चीनला विकासाच्या दिशेने नेणारे पंतप्रधान वेन जिआबाओ यांच्यावर त्यांनी या काळात अब्जावधी डॉलर्सची माया जमविल्याचा आरोप करण्यात आला असून जिआबाओ यांच्या नातेवाईकानीही तब्बल १४४ अब्ज रूपयांची संपत्ती या काळात जमविली असल्याचे उघडकीस आले आहे. १९९२ साली वेन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती.
चीनच्या पंतप्रधानांनीही जमवली अब्जावधींची माया
वेन जिआबाओ पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबर २०१२ ला राजकीय जीवनातून निवृत्ती घेणार आहेत. चीनला प्रगतीची वाट दाखविणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. वेन यांची मुलगी, मुलगा, जावई, भाऊ यांनीही या काळात १४४ अब्ज रूपयांची संपत्ती जमविली असून ती विविध उद्योगांतून गुंतविली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेन यांनीही अन्य मार्गांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमविली असून तीही विविध ठिकाणी गुंतविली गेली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
