अमिताभ करणार दाढी-मिशीचा त्याग

निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी ’सत्याग्रह’ या सिनेमासाठी बिग बी अभिताभ बच्चन यांना साईन करण्यात आले आहे. या सिनेमात अमिताभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अण्णा हजारेंची भूमिका साकारायची आहे म्हटल्यावर अमिताभ यांनी चक्क आपल्या दाढीमिशीचा त्याग करायचे ठरवले आहे. 

या सिनेमाची कथा अण्णा हजारे आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या टीमच्या आंदोलनांवर बेतलेली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी अमिताभ दाढी-मिशीशिवाय मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. अमिताभने गेल्या अनेक वर्षांपासून लकी फ्रेंच दाढी कायम ठेवली होती, मात्र या सिनेमासाठी अमिताभ यांनी आपली स्टाईल चेंज केली आहे.अमिताभ यांच्याबरोबर करीना कपूर आणि अजय देवगणही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

 

Leave a Comment