शाहरुखने घेतले सलमानपुढे नमते

सलमान खानचे ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’ व ‘एक था टायगर’ हे सिनेमे हिट होण्यामागे एक बाब मात्र कॉमन आहे. त्यामुळेच त्याचे हे सिनेमे हिट झाले असे बॉलीवूडमध्ये मानले जाते. त्याचे हे सर्व सिनेमे ईदच्या दिवशी रिलीज झाल्याने हिट झाले आहेत, असे काही जनाचे मत आहे. त्यामुळे ईदची वेळ ही सलमानच्या सिनेमासाठीच बुक अशीच मानली जाते.

त्यामुळेच पुढच्या ईदच्या निम्मिताने सलमानने त्याचा होम प्रोडकशनचा सिनेमा ‘शेर खान’ हा रिलीज करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याचा हा प्लानिंग ऐनवेळी बदलला, व त्याने शेर खान पुढील काळात रिलीज करण्याचे ठरविले. त्यामुळे शाहरुख खानने त्याचा ‘चेन्नई एकस्प्रेस’ हा सिनेमा ईदला रिलीज करण्याचे ठरविले होते. मात्र सलमानने ईदच्या दिवशी ‘शेर खान’ ऐवजी त्याचाच साऊथचा एक रिमेक असलेला सिनेमा रिलीज करीत प्रेक्षकांना पुन्हा या निमिताने कॅश करण्याचे ठरविले आहे. त्याचा ‘वृंदावन’ हा सिनेमा हिंदीत आणण्याची तयारी सध्या सुरु आहे. हे समजल्यानंतर शाहरुखने सलमान सोबत पंगा घेण्याऐवजी त्यामध्ये बदल करत ‘चेन्नई एकस्प्रेस’ हा सिनेमा ईद नंतर दोन-तीन आठवड्यानी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाहरुख खानने हा निर्णय घेऊन सलमानशी पंगा घेण्याचे टाळले आहे. मात्र दुसरीकडे दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होत असलेल्या शाहरुखच्या ‘जब तक हे जान’ या सिनेमाच्या आडवे अजय देवगण त्याचा ‘सन ऑफ सरदार’ हा सिनेमा आणत आहे. त्यामुळे अजयने शाहरुख खानकडून काही तरी शिकावे असे बोलले जात आहे.

Leave a Comment