एनजोलो मैथ्युज श्रीलंकेचा कर्णधार

नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाला अतिंम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे निराश झालेल्या अनुभवी कर्णधार महेला जयवर्धनेने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्याच्या जागी श्रीलंका क्रिकेट बोर्ड नवा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करणार याची उत्सुकता लागली होती. त्याच्या जागी अनुभवी व अष्टपैलू खेळाडू असलेल्या एनजोलो मैथ्युची निवड करण्यात आली आहे. एनजोलो मैथ्युज हा ३० ऑक्टोंबर रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या एकमेव सामन्यात कर्णधार म्हणून कामगिरी पाहणार आहे.

एनजोलो मैथ्युज यापूर्वी श्रीलंका संघाचा उपकर्णधार होता, तर उपकर्णधार म्हणून जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाची नियुक्ती श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी केली आहे. ही नियुक्ती आगामी एक वर्षासाठी असणार आहे. या संघातून अनुभवी फलंदाज असलेल्या कुमार संगकारा व महेला जयवर्धने यांना आराम देण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाने अतिंम सामान्यापर्यंत मजल मारली होती. मात्र या सामन्यात वेस्टविंडीजकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आगामी काळात एनजोलो मैथ्युज याच्या नेतृत्वाखालील नवख्या खेळाडूचा भरणा असलेल्या या श्रीलंका संघाची कामगिरी कशी असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment