ऋषी कपूर करणार दाऊदचा रोल

करण जोहरच्या सिनेमात कॉलेज डीनचा रोल करीत असलेला ऋषी कपूर आता ‘डी डे’ या सिनेमात दाऊदचा रोल करणार आहे. या सिनेमात ऋषी कपूर दाऊदचा रोल करीत पोलीसाना चकमा देण्याचे काम करणार आहे. या सिनेमाचे शूट पुढील महिन्यात सुरु होणार आहे.

ऋषी कपूरने दाऊदचा रोल करावा यासाठी ‘पतियाला हॉउसचे’ डायरेक्टर निखील अडवाणी यांना सहा महिने खर्च करावे लागले. सहा महिन्याच्या विनतीनंतर ऋषी हा रोल करण्यास तयार झाला असल्याचे समजते. सुरवातीच्या काळात ऋषी कपूरने हा रोल करण्यास नकार दर्शविला होता, त्यामुळे हा रोल अरशद वारसिने करावा म्हणून प्लानिंग करण्यात आले होते. मात्र काही दिवसाच्या विनंतीनंतर निखीलला ऋषीने होकार दर्शविला.

‘एजेंट विनोद’ या सिनेमात सैफ अली खान, ‘एक था टायगर’ मध्ये सलमान खानने तर आता ‘डी डे’ या सिनेमात अर्जुन रामपाल हा रा एजेटचा रोल करणार आहे. अर्जुन रामपालला ऋषी कपूर सोबत काम करण्यास मिळणार असल्याने तो सध्या उत्साहित झाला आहे. ‘डी डे’ या सिनेमात अर्जुन पहिल्यादा इरफान खान सोबत काम करणार आहे. ‘डी डे’ या बहुचर्चित सिनेमाचे शूट पुढील महिन्यात सुरु होणार आहे. सिनेमाचे शूट सुरु होण्यापूर्वीच अर्जुन रामपालला ट्रेनिंग देण्यात येत आहे. या सिनेमाच्या शुटला पाकिस्तानमध्ये परवानगी मिळत नसल्याने गुजरात मध्ये शूट होणार असल्याचे समजते.