आदित्य पुढे नेणार यशजीची विरासत

रोमांसचा राजा असा नावलौकिक प्राप्त केलेल्या यश चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांची जागा कोण भरून काढणार असा प्रश्न पडला होता. त्यांची ही विरासत कोण पुढे घेऊन जाणार असा सवाल उपस्थित केला जात असतानाच आता यश राज बनराची सर्व सूत्रे आदित्य चोप्रा पुढे घेऊन जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.

यश राजची ही विरासत पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांची दोन्ही मुले आदित्य आणि उदय चोप्रा खूप सक्षम झाली आहेत. आदित्यने यश चोप्रा यांच्या पावलावर पाउल ठेवत सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात स्वताला झोकून दिले आहे. तर अजून त्या मानने उदय चोप्रा सिने इंडस्ट्रीजमध्ये अजून तसा नवखा आहे. यश राजच्या बनारच्या सूत्रानुसार आदित्य सध्या यश राजची जागा घेऊ शकतो. कारण की त्याने निर्मिती क्षेत्रात पाउल ठेवल्यानंतर काही नवीन कलाकारांना संधी मिळाली. त्यामध्ये रणवीर सिंह, अनुष्का सिन्हा, अर्जुन कपूर, कबीर खान, अली अब्बास यांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे यश राज बनरशी जोडला गेलेला प्रत्येक व्यक्ती हा चोप्रा परिवारचा एक घटक मानला जातो. त्यामुळे हे सर्व अशाच पद्धतीने पुढे घेउन जाण्याची मोठी जबाबदरी आदित्य चोप्रा याच्यावर येऊन पडली आहे. त्यामुळे ही जबाबदारी आगमी काळात आदित्य कशा पद्धतीने पेलतो, याच्यावर या बनेरचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सर्वाना आदित्य कशा प्रकारे ही विरासत पुढे नेणार हे पाहन्यासाठी अजून काही काळ वाट पाहवी लागणार आहे.

Leave a Comment