
गुवाहाटी: भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास घुसखोरी टाळण्यासाठी देशाच्या सीमा सील करणे हे प्रधाण्याक्रामाचे काम असेल; अशी ग्वाही भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिली.

गुवाहाटी: भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास घुसखोरी टाळण्यासाठी देशाच्या सीमा सील करणे हे प्रधाण्याक्रामाचे काम असेल; अशी ग्वाही भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिली.
भारत- चीन युद्धाच्या ५० व्या स्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या उद्घाटन समारंभात गडकरी बोलत होते.
घुसखोरी हे देशाच्या सार्वभौमत्वासमोरील मोठे आव्हान असल्याचे नमूद करून गडकरी यावेळी बोलताना म्हणाले की; कोणत्याही देशात जाण्यासाठी व्हिसा असावा लागतो. अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र भारतात ‘आओ जाओ; घर तुम्हारा;’ अशी परिस्थिती आहे. इथे येऊन तुम्ही मालमत्ता, जमिनी खरेदी करू शकता. इथे भारताविरुद्ध घोषणाबाजी केली तरीही खपवून घेतले जाते; अशी टीका गडकरी यांनी केली.
काँग्रेस मतांचे राजकारण करण्यासाठी घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करून गडकरी यांनी ईशान्य भारतातील अशांत परिस्थितीला काँग्रेस जबाबदार असल्याचे प्रतिपादन केले.
जागतिक आणि उपखंडात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन एकत्रितपणे काम करू शकतात. मात्र त्यावेळी देशापुढील धोक्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; असा इशारा देतानाच गडकरी यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील चीन करीत असलेल्या बांधकामांकडे लक्ष वेधले.
देशालाच्या आर्थिक प्रगतीपासून रोखणारर्या बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले. आर्थिक विकासासाठी थेट विदेशी गुंतवणूक आवश्यक असल्याचेही गडकरी म्हणाले.