संयुक्त संसदीय समितीची बैठक पुन्हा ठप्प

नवी दिल्ली: २ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना साक्ष देण्यासाठी संयुक्त संसदीय समितीसमोर पाचारण करण्याच्या मागणीवरून भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी समितीचे कामकाज बंद पाडले.

यापूर्वी झालेल्या दि.११ ऑक्टोबरच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीतही अध्यक्ष पी.सी. चाको यांनी साक्षीदारांची यादी तयार केली नाही आणि त्यात पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचा समावेश केला नाही; या कारणावरून भाजप सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. याच आठवड्यात समितीतील भाजपचे ज्येष्ठ सदस्य यशवंत सिन्हा यांनी अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात २ जी स्पेक्ट्रम ही विशेष बाब मानून पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना समितीसमोर बोलवावे; अशी मागणी केली. २जी स्पेक्ट्रम वाटपात पंतप्रधानांचा थेट सहभाग असल्याने त्यांना सखीसाठी बोलाविणे आवश्यक आहे; अशी पक्षाची भूमिका आहे.

या प्रकरणी अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना समितीसमोर बोलाविण्याबाबत अध्यक्ष चाको यांनी लोकसभा अध्यक्षांकडून मार्गदर्शन मागितले आहे. मात्र समितीने आधी याबाबत निर्णय घ्यावा आणि नंतर त्यासंबधी विचारणा करावी; असे त्यांना अध्यक्षांकाडूज्न सांगण्यात आले.

Leave a Comment