आमीरकडून करिनाला अनोखी भेट

मुंबई,१५ ऑक्टोबर-बॉलिवूड अभिनेता सैफअली खान आणि करिना कपूर याच्या विवाहाला आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. त्यानिमित्त आमीर खान करिनाला अनोखी भेट देणार आहे. आमीर सध्या शिकागोमध्ये यश राज बॅनरच्या धुम-३ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
करिनासाठी ठेवण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात आमीर सहभागी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीरने निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यासोबत मिळून एक योजना तयार केली आहे. तलाशची सर्व टीम, आमीर, राणी मुखर्जी, नवाजुद्दीन सिद्दीकी, रीमा कागती आणि इतर कलाकार करिनाबद्दलच्या आपल्या भावना या कार्यक्रमात व्यत्त* करणार आहेत. तसेच तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील देणार आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनीस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर सध्या शिकागोमध्ये यश राज बॅनरच्या धुम-३ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सगळ्या व्यापातूनही आमीरने करिनाच्या लग्नासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. आपला आगामी चित्रपट तलाशच्या म्युझीक लॉन्चसाठी तो १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे.

Leave a Comment