वाळू माफियांचा पुन्हा सक्रीय

मुंबई दि.१५- वाळू माफिया पुन्हा राज्यात सक्रीय झाले असून जळगांव जिल्ह्यातील अम्मळनेर तालुक्याच्या तहसीलदारांवर त्यांनी हल्ला चढविल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

या प्रकरणाची हकीकत अशी की बोरी नदीतील वाळू उपसा करणार्‍या तीन वाहनांना तेथील तहसीलदार अशोक जगदेव यांनी अडविले. नदीजवळ उभ्या असलेल्या या वाहनांवर त्यांनी छापा घातला तेव्हा वाळू माफियांनी जगदेव यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. जगदेव यांच्या किंकाळ्या ऐकून नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी जगदेव यांची आग विझविली. यात जगदेव गंभीर जखमी झाले असल्याचे समजते.

या हल्ल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून हल्ला करणार्‍यातील एकाला पकडले गेले आहे. त्याचे अन्य तीन साथीदार मात्र पळून गेले आहेत असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 

Leave a Comment