बीग बीच्या नावाचे अॅप

मुंबई दि.११ – बॉलिवूडचा शहनशहा बीग बी अमिताभ बच्चन यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त टेकझेन या कंपनीने बीग बी मोबाईल अॅप आणि वॅप पेज तयार केले असून त्यांच्या सन्मानार्थ हे अॅप तयार केल्याचे कंपनीचे संचालक नवीन भंडारी यांची जाहीर केले आहे. 

अॅपल डिव्हाईसवर चालणार्‍या या बीग बी अॅपमुळे युजर बीग बीच्या सर्व माहितीबरोबरच युनिव्हर्सल म्युझिकची सर्वोत्तम १०० गाणी, अमिताभच्या  २०० चित्रपटांच्या रिलीज डेट व अन्य माहिती तसेच बीग बी क्वीझ डाऊनलोड करू शकणार आहेत. ज्यांना अॅपल डिव्हाईसचा वापर शक्य नाही ते अन्य कोणत्याही मोबाईलवरून वॅप पेजवरून हीच माहिती मिळवू शकणार आहेत. इतकेच नव्हे तर बीगबीच्या ट्वीटलाही युजर अॅक्सेस करू शकणार आहेत. आज गुरूवारी साजर्‍या होत असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही युजर त्यांना या अॅपचा वापर करून देऊ शकणार आहेत.

टेकझेन कंपनीचे नवीन भंडारी स्वतः अमिताभचे फॅन आहेत. त्यातूनच ही कल्पना सुचल्याचे सांगून ते म्हणाले की कंपनीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीचे मनोरंजनाचे बरेचसे हक्क आहेत. यापुढेही लोकप्रिय सेलेब्रिटींसाठी स्वतंत्र अॅप तयार करण्याचा कंपनीचा मनोदय असून त्याची सुरवात बीगबी पासून केली आहे.

 

Leave a Comment