ऐश्वर्या रॉय ही फक्त देशी मिडीयायात नव्हे तर अंतरराष्ट्रीय स्तरावरील मीडीयातही तितकीच फेमस आहे. गेल्या काही दिवसापासून ती बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार की नाही यावरून बराच खल सुरु असताना तिकडे मात्र ब्रिटीश पत्रकार सर डेविड फ्रास्ट यांच्या शो मध्ये हॉट सिटवर ती बसणार आहे. ऐश्वर्या रॉयच्या पूर्वी या शोमध्ये हॉलीवूडमधील ओपरा विनफ्रे आणि डेविड लेटरमन हे या शो मध्ये सहभागी झाले होते.
सूत्राने दिलेल्या माहिती नुसार ब्रिटीश पत्रकार सर डेविड फ्रास्ट एक नवीन शोची सुरुवात करीत आहेत. त्या शोचे नाव ‘फ्रास्ट शो’ असे राहणार आहे. या शोच्या माध्यमातून ते प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या व्यक्तीमहत्वाची एक तास इंटरव्युव घेणार आहेत. या शोचा पहिला मानकरी होण्याची संधी ऐश्वर्या रॉयला मिळाली आहे.
येत्या काही दिवसातच बिग बी अमिताभ बच्चनचा वाढदिवस होणार आहे. त्यासाठी सर डेविड फ्रास्ट मुंबईला येत आहेत. त्यावेळी ऐश्वर्या रॉयची ती भेट घेऊन या शो मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण तिला देणार असल्याचे समजते. काही दिवसापूर्वी फ्रास्टने माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सोन यांचा इंटरव्युव घेतला होता. त्याच्यावर नंतर नाटक व सिनेमाची निर्मितीही करण्यात आली होती. त्यामुळे अंतरराष्ट्रीय पातळीवर या शोला विशेष महत्व आहे.