‘थोडे खा; पण जरा जपून…’: मुलायम

लखनौ: काही काम करा; थोडे खा; पण जरा जपून! पक्षाची आणि सरकारची प्रतिमा डागाळेल; असे काही करू नका; हा आहे समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचा आपल्या मंत्र्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी नवा संदेश!

भारतीय समाजवादाचे अर्ध्वयू आणि विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलायम यांनी हे तारे तोडले हे विशेष!

काही प्रमाणात कामे स्वीकारा. काही कामे करा. थोडेफार पैसे कमवा. मात्र संयम ठेवा. सपच्या मंत्र्यांच्या आचरणाकडे कोणी बोट दाखविता कामा नये; असा ‘बहुमोल’ आदेश यादव यांनी दिला आहे.

यापूर्वीही मुलायम सिंग याचे बंधू आणि उत्तरप्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवपालसिंह यादव यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना असाच मोलाचा संदेश दिला होता. कष्ट करीत असाल तर थोडी फार चोरी करायला हरकत नाही. दरोडा मात्र घालू नका; हा शिवपालसिंह यांचा संदेश!

Leave a Comment