वीजेची टंचाई आणि सातत्याने होत असलेली वीजेची दरवाढ याला सर्वसामान्यांपासून अतिश्रीमंतांपर्यंत सर्वच वैतागले आहेत. पण आता संशोधकांमुळे घरच्या घरी स्वस्तात वीज मिळण्याचा मार्ग खुला झाला असून त्यासाठी फक्त स्मार्ट विंडो चा पर्याय स्वीकारावा लागणार आहे.

संशोधकांनी घराच्या खिडक्यात बसविता येतील असे पारदर्शक सोलर सेल तयार केले असून हे सेल सूर्याच्या प्रकाशातील इन्फ्रारेड किरणे शोषून त्यापासून वीज निर्मिती करू शकतात. हे किरण मानवी डोळ्यांना दिसू शकत नाहीत मात्र ही पॅनल खिडक्यांवर बसविली तरी ती पारदर्शक असल्याने माणसाला घराच्या खिडक्यातून बाहेरचे दृष्य दिसू शकते.
पॉलिमर सोलर सेलचा मुख्य फायदा असा की हे वजनाला अतिशय हलके, लवचिक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्पादन केले तर ते स्वस्तात बनविता येतात. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळात, कमी खर्चात हे पॅनल बसविणे शक्य होणार आहेच पण वीज निर्मिती घरच्याघरीच झाल्याने वीजेची बिले भरणे, वीज तोडली जाणे आणि वीज भारनियमन टाळता येणार आहे.