नवी दिल्ली: राजधानीत मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ला घडविण्याचा इंडियन मुजाहिदीनचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. मुजाहिदीनच्या तिघा अतिरेक्यांना जेरबंद करून पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे.

दिल्ली पोलिसांना गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी दशहरा, दिवाळी या सणासुदीच्या दिवसात राजधानीत मोठ्या प्रमाणावर घातपाती कृत्य घडवून आणण्याचा या अतिरेक्यांचा डाव उध्वस्त केला. हे दहशतवादी इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ याच्याशी संबंधित असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
या दहशतवाद्यांची पोलीस कसून चौकशी करीत असून त्यातून अनेक घातपाती कृत्यांच्या तपासाला गती मिळण्याबरोबर मुजाहिदीनच्या व्याप्ती आणि कार्यपद्धतीची उपयुक्त माहिती मिळेल असा पोलिसांचा विश्वास आहे.