
लंडन दि.१० – विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याची पॉपस्टार लेडी गागा हिने इक्वेडोरच्या दुतावासात जाऊन भेट घेतली असल्याचे समजते. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सात वाजता दूतावासात गेलेली लेडी गागा दोन तासांनी बाहेर पडली व या काळात तिने असांजे बरोबर डिनर घेतले असेही सांगितले जात आहे. असांजेच्या सुटकेसाठी ज्या नऊ सेलिब्रिटीज पाठिबा देत आहेत त्यात आता गागाचाही समावेश झाला आहे.
