चॉकलेट उद्योगाची गगनभरारी

नवी दिल्ली दि.१० – भारतात चॉकलेट उद्योगाची वाढ प्रचंड वेगाने होत असून २०१५ पर्यंत या उद्योगाची उलाढाल ७५०० कोटींच्या घरात जाईल असा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे. 

असोचेमचे महासचिव डी.ए. रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातही चॉकलेटचा खप प्रचंड वाढला असून त्यात दिवसेनदिवस भरच पडते आहे. सध्या ही वाढ २५ टक्के आहे मात्र आगामी सणासुदीचे दिवस पाहता ही वाढ ३५ टक्क्यांची पायरी गाठेल असा अंदाज आहे. सध्या भारतात चॉकलेट उद्योगाची उलाढाल ४५०० कोटी रूपयांची आहे.

गतवर्षीच्या तुलनेत निमशहरी आणि ग्रामीण भागातही मिठाईऐवजी चॉकलेट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. आकर्षक पॅकिंग ही चॉकलेटची मागणी वाढण्याचे एक कारण असले तरी एकंदरीत ग्राहकाची वाढलेली कमाई, आणि मिठाईच्या तुलनेत परवडणारे पॅकिंग व दर हीही अन्य कारणे आहेत. सध्या अर्बन मार्केटमध्ये चॉकलेटचा खप ६५ टक्क्यावर गेला आहे. मात्र त्याचबरोबर कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि किमतींबाबत जागरूक असलेला ग्राहक ही आव्हानेही या उद्योगासमोर आहेत.

 

Leave a Comment