जुंदालवर मुंबई हल्ल्याचा सूत्रधार म्हणून आरोपपत्र

मुंबई दि.८- मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एलइटी ऑपरेटिव्ह अबू जुंदालवर या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ठेवणारे पुरवणी आरोपपत्र दाखल गेले जाणार असल्याचे मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. २० आक्टोबरपर्यंत हे पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

जुंदालला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मुंबईवरील हल्यासंबंधी त्याला चार महिने अगोदरच सर्व कल्पना होती हे उघड झाले आहे. तसेच हिंदीचा पदवीधर असलेल्या जुंदालनेच कसाब आणि त्याच्या अन्य ९ सहकार्‍यांना हिदी बोलण्याचे प्रशिक्षण दिले होते. यामुळेच हे दहशतवादी भारतीय सुरक्षा संस्थांची दिशाभूल करू शकले असे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कसाब आणि जुंदाल यांची आर्थर रोड जेलमध्ये भेट झाली त्यातूनही ते दोघे एकमेकांशी परिचित होते असे स्पष्ट झाले आहेच. जुंदाल आणि कसाब या दोघांनी तसा कबुलीजबाब दिला आहे. 

मुंबईतील नरीमन हाऊसवर हल्ला होत असताना जुंदालनेच कराचीतील कंट्रोल रूममधून त्यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या हेही स्पष्ट झाले आहे. या वेळचा फोनवरचा जुंदालचा आवाज सुरक्षा यंत्रणांनी टिपला होता तो मॅच झाला आहे. अर्थात फोरेन्सिक लॅबकडून अद्याप अहवाल मिळालेला नाही.मात्र तो लवकरच मिळेल असेही हे अधिकारी म्हणाले.

 

Leave a Comment