पेन ड्राईव्हची वाढती क्षमता

pendrive

पेन ड्राईव्ह शिवाय  आजकालच्या तरुणांचे पान हलत नाही. दोन जीबी पासून ते अलीकडे १२८ जीबीपर्यंतचे पेन ड्राईव्ह बाजारात उपलब्ध आहेत. तरुणांत हे पीडी या नावाने जास्त प्रचलित आहे. केवळ दोन ते चार इंच लांबीच्या पेन ड्राईव्हमध्ये तुम्ही आवश्यक त्या सर्व बाबी घेऊन फिरू शकता.गरज पडेल तिथे पर्सनल कंप्यूटर, लॅपटॉप, आणि आता तर टीव्हीतही हे लावून झटपट आपल्या कामाच्या गोष्टी काढल्या जात आहेत. घरी काम केले आणि ऑफिसमध्ये आपल्या कंप्यूटरमध्ये पेन ड्राईव्ह लावून बॉसला काम दाखविणे सोपे झाले आहेत. 

पेन ड्राईव्हबरोबरच आपण फ्लॅश ड्राईव्हचे देखील नाव ऐकले असेल. पेन ड्राईव्हआणि फ्लॅश ड्राईव्हमध्ये फरक काय, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. अनेक यूजर याबाबत कंफ्यूज असतात की पेन ड्राईव्हआणि फ्लॅश ड्राईव्ह दोन वेगवेगळे डिवाइस आहेत, मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की, हे एकाच डिवाइसचे वेगवेगळे नाव आहे. व्हीडियो, ऑडियोशिवाय इतर डेटा सेव करण्यासाठी पेन ड्राईव्हचा वापर केला जातो. पेन ड्राईव्ह किंवा फ्लॅश ड्राईव्ह कंप्यूटर, लॅपटॉप किंवा इतर डिवाइसला कनेक्ट केल्यावर एक नोटिफिकेशन मिळते. मोबाइलमध्ये वापरले जाणारे मेमरी कार्डदेखील फ्लॅश ड्राईव्हअंतर्गत येते. फक्त मोबाइल कार्डचे इंटरफेस दुसरे असते. 

पेन ड्राईव्हची क्षमता आणि लुक यात बदल केले जात आहेत. याच बदलाच्या श्रेणीत काही महिन्यापूर्वी अमेरिकेच्या सॅनडिस्क कॉरपोरेशनने जागतिक स्तरावर १२८ जीबीचा जबरदस्त क्षमतेचा पेन ड्राईव्हभारतीय बाजारात लाँच केला. काही दिवसांपूर्वी सॅनडिस्कने केलेल्या एका पाहणीत असे स्पष्ट झाले की, जगभरात यूएसबी आणि पेन ड्राईव्हचा वापर सर्वात जास्त युवावर्ग करीत आहे. भारतात युवकांची लोकसंख्या सुमारे ४० कोटीपर्यंत पोहोचली आहे. सॅनडिस्कचे १२८ जीबीचे पेन ड्राईव्ह सर्वात वेगवान, पातळ आणि अधिक क्षमतेचे आहे. या पेन ड्राईव्हमध्ये तीन जीबीची फाइल २० सेकंद आणि ४० जीबीची फाइल चार मिनिटात अदान-प्रदान केली जाऊ शकते.

आजकल पेन ड्राईव्हचा वापर वेगवेगळ्या डिवाइसमध्ये केला जातो. यात व्हायरस येण्याचीही शक्यता खूप असते. त्यामुळे याला वारंवार फॉर्मेट केले जाते.

भारताबरोबरच जगभरात स्मार्टफोनचा बाजार विस्तारात आहे. त्याबरोबरच मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्हची मागणीही वाढत आहे. आकडेवारीकडे लक्ष दिले तर २०११ या वर्षात यूएसबीचा जागतिक बाजार सात कोटी डॉलर राहिला होता. तो २०१४ पर्यंत एक अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment