सलमानचा नवा बिजनेस मॉडल

इंडस्ट्रीजमध्ये १०० कोटी रुपयाची कमाई करून देणाऱ्या हिरोचा दिमाख भलताच वेगळा असतो. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून सलमानने आता नवीन फरमान जाहीर केले आहे. त्यामुळेच याला सलमानचा नवा बिजनेस मॉडल मानले जात आहे.

सप्टेंबर महिन्यापासून सलमानने हा नवीन नियम लागू केला आहे. त्यानुसार आता निर्मात्यांना एक फिक्स्ड रिम्युनरेशन मिळणार आहे. १५ ते २० कोटी पर्यंत ते रिम्युनरेशन असणार आहे. त्यानंतर सिनेमापासून होणाऱ्या कमाईवर सलमानचा हक्क असणार आहे. त्याचा हा नवीन नियम आगामी काळात येणाऱ्या सर्व सिनेमाना लागू असणार आहे.

सलमानच्या या नव्या निर्णयामुळे दोन बाबी पुढे आल्या आहेत. काहीच्या मते सलमानने हा निर्णय ओवरकॉन्फिडन्समुळे घेतला आहे. दबंग, वांटेड, बॉडीगार्ड आणि ‘एक था टायगर’ सारख्या हिट सिनेमामुळे सलमानचा भाव चांगलाच वधारला आहे. तर काहीच्या मते सलमानने हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. यामुळे यामधून सलमानला देखील रिस्क आहे. सूत्राच्या मते प्रोडक्शन कॉस्ट आणि फिक्सड रिम्युनेशन अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही व त्याचा सिनेमा चांगला रिटर्न देत नसेल तर सलमानला धोका आहे. यापूर्वीच शाहरुख खान व अमीर खान देखील अशाच प्रकारच्या मॉडलवर चालत आहे.

Leave a Comment