लग्नासाठी करीनाने घेतली सुट्टी

बॉलीवूडचा स्टार सैफ अली खान सोबत करीना कपूर १६ ऑक्टोबर रोजी विवाह करणार आहे. त्यामुळे दोन्ही घरात सध्या लगिनघाई सुरु आहे. लग्नाची तयारी अतिंम टप्यात आली असून त्यासाठी सध्या करीनाने एक महिन्याची सुट्टी घेतली आहे. सध्या ती लग्नाचा पूर्ण प्लानिंग करण्याच्या कामात व्यस्त आहे.

करीनाने लग्नाच्या निम्मिताने शुटींगच्या बीझी शेडयुल मधून एक महिना सुट्टी घेतली आहे. या सुट्टीच्या काळात ती आगामी काळात येत असलेल्या सिनेमाच्या प्रमोशनचे काम ही करणार नाही. करीनाचा अमीर खान सोबतचा बहुचर्चित तलाश हा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून करीना या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामापासून दूर आहे.

करीनाने याबाबत अमीर खानला विनंती केली आहे. २१ ऑक्टोबर पर्यन्त लग्नाची धामधूम चालणार असल्याने तिने त्यानंतर प्रमोशनच्या कामासाठी वेळ देण्याचे ठरविले आहे. या सिनेमाच्या प्रमोशनचे काम १ नोव्हेंबर नंतर सुरु होणार आहे.

Leave a Comment