सारकोझींनी करविली कर्नल गद्दाफींची हत्या: डेली मेल

लंडन: लीबियाचे हुकूमशहा कर्नल मुअम्मल गद्दाफी यांची हत्या संतप्त विद्रोही जमावाने नव्हे; त्या जमावात घुसलेल्या फ्रेंच गुप्तहेराने केली. हे कृत्य फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती निकोलस सारकोझी यांच्या आदेशावरून करण्यात आले; असा खळबळजनक गौप्यस्फोट ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने केला आहे. विशेष म्हणजे लीबियाच्या विद्यमान सरकारनेही या निष्कर्षाला पुष्टी दिली आहे.

लीबियावर तब्बल ४२ वर्ष एकछत्री अंमल गाजविणार्या कर्नल गद्दाफी यांचे अनेक पाश्चात्य राष्ट्रप्रमुखांशी निकटचे संबंध होते. त्यामध्ये ब्रिटीश पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि सारकोझी यांचाही समावेश आहे. राष्ट्रापाडी पदाच्या निवडणुकीसाठी सारकोझी यांना कर्नल गद्दाफी यांनी लाखो डॉलर्सचा निधी पुरविला होता. नाते सैन्याने लीबियावर केलेल्या आक्रमणाला सारकोझी यांनी समर्थन दिल्यावर कर्नल गद्दाफी यांनी सारकोझी यांना पुरविलेल्या निधीबाबत गौप्यस्फोट करण्याची धमकी दिली आणि सारकोझी यांना वारंवार या आरोपाचा इन्कार करावा लागला.

या आरोपाची सखोल चौकशी होऊन आपण दोषी ठरू नये; यासाठी सारकोझी यांनी आपल्या गुप्तचराला कर्नल गद्दाफी यांना संपविण्याची कामगिरी सोपविली. या गुप्तचराने विद्रोही गटात सामील होऊन खंदकात लपलेल्या कर्नल गद्दाफींच्या डोक्यात आणि पायावर गोळ्या घालून त्यांची हत्या केली; असे ‘डेली मेल’ने नमूद केले आहे.

Leave a Comment