लतादिदींवर झाला होता विषप्रयोग

नवी दिल्ली: गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर पूर्वी विषप्रयोग झाला असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट डोगरी कवयित्री आणि मंगेशकर यांची जवळची मैत्रीण पद्मा सचदेव यांनी आपल्या ‘ऐसा काहांसे लाऊ’ या पुस्तकात केला आहे.

लता मंगेशकर ३३ वर्षाच्या असताना एक दिवस त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हिरवट रंगाच्या उलट्या झाल्या. त्यांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. यावेळी लता दीदींचा खानसामा पळून गेला आणि त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी स्वयंपाकघर सांभाळले; अशी माहिती या पुस्तकात दिली आहे.

हा प्रकार लतादिदींनीच आपल्याला सांगितल्याचा दावा सचदेव यांनी केला आहे. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांना दिलेल्या मुलाखातीतही लता दिदींनी ही घटना कथन केली होती.