माधुरी-श्रीदेवी थिरकणार पहिल्यांदाच एकत्र

बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित व इंग्लिश विंगलिश सिनेमातून पुनरागमन करणारी श्रीदेवी या दोघीजण पहिल्यदाच एका व्यासपीठावर एकत्रित येऊन थिरकणार आहेत. त्यामुळे दोघीजन ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये एकत्र येणार असल्याने त्यांच्या फॅन्समध्ये उत्सहाचे वातावरण आहे.

‘झलक दिखला जा’ या शोचा शनिवारी ग्रंड फिनाले आहे. त्यामुळे या शोवेळी जज म्हणून माधुरी दीक्षित, करन जोहर व रेमो डिसूझा हे काम पाहणार आहेत. तर या शो मध्ये श्रीदेवी ही तिचा आगामी काळात येत असलेल्या ‘इंग्लिश विन्ग्लीश’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शो मध्ये सहभागी होणार आहे. या वेळी श्रीदेवी ही चांदणी या सिनेमातील ‘मेरे हाथो मै नव नव चुडिया’ या गाण्यावर तर माधुरी दीक्षित ही ‘बेटा’ या सिनेमातील ‘धक धक करने लगा’ या गाण्यावर थिरकणार आहे. यावेळी दोघीपण एकमेकासोबतच दोन्ही गाण्यावर डान्स करणार आहे.

गेल्या काही दिवसापासून दोघींनी पण एकत्रित काम केले नाही. त्यामुळे एके काळी आपल्या अदाकारिने बॉलीवूडवर भुरळ घालणाऱ्या माधुरी व श्रीदेवीला एकत्रित डान्स करताना बघण्याची उत्सुकता लागली आहे.