
‘बर्फी’ या सिनेमामुळे चर्चेत असलेला चॉकलेट बॉय रणबीर कपूर सध्या लग्नाचा विचार करीत आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून तो सुयोग्य अशा मुलीच्या शोधात असल्याचे समजते. येत्या काळात लवकरच लग्न करणार असल्याची कबुली ‘बर्फी’ बॉय रणबीरने नुकतीच एका एफ.एम. रेडीओ स्टेशनला दिलेल्या मुलाखती प्रसंगी त्याने दिली. लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी वेळ ठरलेला असतो, त्यावेळेनुसारचा सर्व काही आयुष्यात घडले पाहिजे. त्यामुळे सध्या लग्नासाठी हीच वेळ योग्य असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
