बॉलीवूडमधील अभिनेत्रीना सिनेमात काम करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. दिग्दर्शकाकडून घातल्या जात असलेल्या अटीमुळे कॉन्ट्रक्ट साईन करायचे की नाही याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागत आहे. रामलीलाच्यावेळी करीना कपूरला प्रेग्नंट न राहण्याची अट घालण्यात आली होती. ती अट करीनाला मंजूर नसल्याने तिने काम करण्याचे टाळले असल्याचे गुपित आता उघडकीस आले आहे.
काही दिवसापूर्वीच मधुर भांडारकर व ऐश्वर्या रॉय यांच्यातील ‘हिरोईन’ या सिनेमाचे कॉन्ट्रक्ट याच कारणामुळे तुटले होते. आता हा सर्व प्रकार ताजा असतानाच करीनाने त्याच कारणामुळे दिग्दर्शक संजय भन्साळी यांचा ‘रामलीला’ हा सिनेमा सोडला आहे. करीनाने ही घातलेली अट मान्य केली नसल्याने तिला सिनेमा सोडवा लागला होता. करीनाने लवकरच विवाह करणार असल्याने तिने ही अट मान्य केली नसल्याचे उघड झाले आहे.
करीनाने हा सिनेमा सोडल्यानंतर तिच्या जागी दीपिका पादुकोनची वर्णी लागली आहे. सध्या या सिनेमाचे शूट सुरु असून २०१३ च्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे समजते.