अक्षय-ट्विंकलच्या घरी आली लक्ष्मी

सध्या अक्षयकुमारवर त्याचे नशीब भलतेच खूष दिसत आहे. येत्या काही दिवसातच त्याचा बहुचर्चित ‘ओह माय गॉड’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याची तयारी सुरु असतानाच या सिनेमात देवाची भूमिका करणाऱ्या अक्षयच्या घरी लक्ष्मी जन्माला आली आहे.

अक्षयची पत्नी ट्विंकलने मंगळवारी सकाळी ब्रीच केंडी हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला आहे. हॉस्पिटलच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ट्विंकलची डिलीवरी नॉर्मल झाली आहे. आई व बाळाची प्रकृति ठीक आहे. अक्षयकुमारचा मुलगा आरव सध्या १० वर्षाचा आहे. मुलगी झाल्याने अक्षय व ट्विंकल दोघेही जाम खूष झाले आहेत.

सध्या अक्षय कुमार ‘ओह माय गॉड’ हा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोमवारी रात्री एका ठिकाणी तो याचा इवेंट मध्ये सहभागी झाला असताना त्याला निरोप भेटल्यानंतर तो लगेचच ब्रीच केंडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. बॉलीवूडमधील सहकार्यांनी अक्षय व ट्विंकलचे अभिनंदन केले.