मल्लिकाच्या सोबतीने उजळणार विवेकची ‘किस्मत’

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमधील बिनधास्त अभिनेत्री मल्लिका शेरावत व विवेक ओबेरॉय यांची केमेस्ट्री चांगलीच जुळली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र जोरात सुरु आहे. या दोघांचा बहुचर्चित असा ‘किस्मत लव पैसा’ हा सिनेमा काही दिवसातच रिलीज होणार आहे. सध्या मल्लिका आणि विवेक या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात बीजी आहेत.

प्रमोशनच्यावेळी मल्लिका व विवेकने एकच टी शर्ट घातली असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. याबाबत बोलताना विवेक म्हणाला, ‘ अशा स्वरूपाचा इवेंट करण्यापूर्वी प्रियांकाने विवेकची पत्नी प्रियंका अल्वाकडे परमिशन मागितली होती. त्या दोघी मैत्रीणी असल्यामुळे प्रियंकाने परवानगी दिली आहे. दिल्लीमधील थंडीत हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत सोबत काम करताना वातावरण गरम झाले होते.’

‘किस्मत लव पैसा’ या सिनेमातून सध्याच्या काळात महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशात सध्या गॅस व डिझेल, रॉकेलच्या वाढलेल्या दरामुळे झालेल्या या गंभीर मुद्याला हलक्या आणि कॉमेडीच्या माध्यामातून सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.