आजपासून रंगणार सेमिफायनलसाठी रेस

श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-२० च्या विश्वचषकासाठीच्या सेमीफायनलसाठी गुरुवारपासून रेस सुरु होणार आहे. सुपर आठमध्ये आठ टीम सहभागी झाल्या आहेत. पहिल्या फेरित अपेक्षेप्रमाणे बांगलादेश, झिम्बाब्वे, आयर्लंड व अफगाणिस्तान हे चार संघ बाहेर पडले आहेत.

दुसऱ्या फेरीत दाखल झालेल्या आठ संघासाठी दोन गट तयार करण्यात आले असून चार- चार टीमची वाटणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातून पहिल्या दोन क्रमाकांचे संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहेत. भारताची लढत २८ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे तर ३० सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान अशी लढत होणार आहे. २००७ नंतर पाहिल्यादाच दोन्ही संघा दरम्यान सामना होणार आहे. २००७ च्या फायनलमध्ये भारताने पाकचा ५ धावांनी पराभव केला होता. २ ऑक्टोबर रोजी भारताची लढत दक्षिण आफ्रिका सोबत होणार आहे. भारतासाठी या तीनही लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे.

ग्रुप ‘अ’ मध्ये इंग्लंड, वेस्टइंडीज, न्यूझीलंड व श्रीलंका या संघाचा समावेश आहे तर ग्रुप ‘ब’ मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया. पाकिस्तान व दक्षिण आफ्रीकेचा समावेश आहे. दरम्यान आज यजमान श्रीलंका व न्यूजीलंड यांच्यात तर दुसरा सामना वेस्टइंडीज व इंग्लंड यांच्यात काट्याची लढत होणार आहे. तर उद्या शुक्रवारी भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी तर पाकची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

Leave a Comment