बिपाशा बसू पार्टनरच्या शोधात

बॉलीवूडमधील बंगाली बाला म्हणून सर्वांना परिचित असलेली बिपाशा बसू हिचे जॉन अब्राहम सोबत बराच काळापासून चालले रिलेशन ब्रेक झाल्याने आता ती एका विश्वासू पार्टनरच्या शोधात आहे. यापूर्वी बिप्सचे नाव शाहीद कपूर, राना दागुबत्ती, जोश हर्नेट यांच्या सोबत जोडण्यात आले आहे.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखातीत बिप्स म्हणाली, ‘ गेल्या काही दिवसाच्या कालावधीत आयुष्यात खूप असे बदल घडलेले नाहीत. आतपर्यंत आलेले अनुभव ही काही सांगन्यासारखे नाहीत. मी माझ्या आयुष्यात काही गोष्टी चुकीच्या केल्या आहेत. त्यामुळे त्या चुकाचे फळ आता मला भोगावे लागत आहे.’ या सर्व परस्थितीतीतला जबाबदार कोण आहे हे सांगणे मात्र तिने यावेळी टाळले.

मी जरी एवढे दिवस स्टेबल रिलेशनमध्ये राहिले असले तरी सध्या मी मात्र चांगल्या पार्टनरचा काही दिवसापासून शोध घेत आहे. मात्र सध्या मला चांगला पार्टनर मिळेल यावर विश्वास नसल्याचे बिपाशाने स्पष्ट केले.

Leave a Comment