बाबासाहेब कुपेकर यांचे निधन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे बुधवारी सकाळी कर्करोगाने निधन झाले. ते ७० वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी संध्यादेवी आणि तीन कन्या असा परिवार आहे.

कुपेकर यांच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना काही दिवसापूर्वी मुंबई येथील जसलोक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. बुधवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

कुपेकर हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. बिधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि कार्यक्षम पद्धतीने काम केले. विविध सहकारी संस्थांमध्ये बाबासाहेबांनी महत्वाच्या जबाबदार्या पार पाडल्या.

गुरुवारी कागल तालुक्यातील कानडेवाडी या कुपेकरांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील

Leave a Comment