नवी दिल्ली: अमेरिकेत वोलमार्टला घालवून देण्याची मागणी जोर धरत असताना आपल्या सरकारने वोलमार्टसाठी लाल गालीचा पसरून स्वागताचे तयारी केली आहे; अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी सरकार आणि प्न्ताप्र्धन मनमोहन सिंग यांची रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निर्णयाबद्दल खिल्ली उडविली.
ज्या दिवशी पंतप्रधानांनी विदेशी गुंतवणुकीला मान्यता देऊन वोलमार्टसारख्या मॉलच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरण्याचे काम करीत होते त्याच दिवशी ‘वोलमार्टला न्यूयॉर्क शहरातून हाकलून काढा; ही मागणी करीत अमेरिकेतील हजारो लोक रस्त्यावर उतरले होते; असा उल्लेख अडवानी यांनी आपल्या ब्लॉगवर केला आहे. वोल मार्टमुळे आजूबाजूच्या परिसरातील लहान आणि मध्यम व्यापारी आणि उद्योग रसातळाला गेल्याचा उल्लेख असलेल्या अमेरिकन वेबसाईटचा संदर्भही अडवानी यांनी दिला.