शीर्षक वाचून अचंबित झालात ना… आता दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्माने बॉयफ्रेंडची अदलाबदली केली म्हणजे नेमके काय केले हा प्रश्न कुणाच्याही मनात येणे स्वाभाविकच आहे. तुम्हाला दीपिकाचा लेटेस्ट एक्स बॉयफ्रेंड कोण होता हे माहित आहे का? बरोबर आम्ही बोलतोय ते सिद्धार्थ माल्याबद्दल. दीपिका आणि सिद्धार्थ यांचे बरेच दिवस अफेअर होते. मात्र अलीकडच्याच काळात या दोघांचे ब्रेकअप झाले. पण आता सिद्धार्थचे सिंगल हे स्टेटस बदलणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण सिद्धार्थची बबली गर्ल अनुष्काबरोबरची मैत्री वाढली आहे. सध्या अनुष्का आणि सिद्धार्थ डेटिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे.
दीपिका-अनुष्काच्या बॉयफ्रेंडची अदला-बदली
तर सिद्धार्थ माल्याबरोबर डेटिंग सुरु होण्यापूर्वी अनुष्काचे रणवीर सिंगबरोबर सुत जुळले होते. अनुष्काने सिद्धार्थचा हात पकडल्यामुळे रणवीर एकटा पडला होता. पण आता रणवीरचाही एकटेपणा दुर झाला आहे. कारण त्याला साथ मिळाली आहे ती दीपिका पदुकोणची. रणवीर आणि दीपिका ’रामलीला’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. सेटवर म्हणे हे दोघे एकांतात बराच वेळ घालवत असतात. यावरुन दीपिका आणि अनुष्काने चक्क बॉयफ्रेंडची अदलाबदली केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
