गंमत अंगलट आली – सुशीलकुमार शिंदे

सातारा, दि. १६ – मी केवळ गंमत करण्याचा प्रयत्न केला. पण तो माझ्या अंगलट आला अशी सारवारव केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदें यांनी आज कराडमध्ये केली. बोफोर्स विसरले तसेच लोक कोळसा घोटाळाही विसरतील असे विधान सुशीलकुमार शिंदेंनी काल पुण्यात केले होते. त्यांच्या या विधानावरुन काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. विरोधकांनीही शिंदेंवर कडाडून टीका केली.

शिंदे यांच्या विधानातून काँग्रेसने बोफोर्स घोटाळा केला होता तसेच कोळसा घोटाळाही झाला होता, असा अर्थ निघतो. त्यामुळे विरोधकांचे आयतेच फावले आहे. हात काळे झाले तर ते साफ करता येतात मात्र तोंड काळं झाल्यावर काय करणार अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

Leave a Comment