वरिष्ठांच्या छळाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या

औरंगाबाद: वरिष्ठांच्या छळाला कंटाळून महिला पोलीस कर्मचार्याने आत्महत्या केल्याचा प्रकार करमाड पोलीस ठाण्यात उघड झाला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला निलंबित करुन अटक करण्यात आली.

संध्या धर्म मोरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. त्या करमाड पोलीस ठाण्यात नेमणुकीला असून त्यांचे पती लष्करात आहेत. करमाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युसुफ शेख यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केलेली चिठ्ठी त्यांच्या घरात आढळून आली. मोरे यांनी यापूर्वीही शेख यांच्याबद्दल पोलीस उप अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्याकडे तक्रार केली होती.

Leave a Comment