शार्कतज्ञ रॉन टेलर कालवश

सिडनी: ऑस्ट्रेलियातील सागरी संवर्धन कार्यकर्ते आणि शार्कतज्ञ रॉन टेलर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जॉ या चित्रपटातील शार्क माशांची थरारक दृश्य चित्रित करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

मागील दोन वर्षापसून टेलर हे कर्करोगाशी झुंज देत होते. रविवारी सिडनीतील एक रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

शार्कबद्दलची भीती दूर करून त्याच्याबद्दल आत्मीयता निर्माण करण्याचे कार्य टेलर आणि त्यांच्या पत्नी वालीरीया यांनी केले. अनेक वर्ष पांढर्‍या शार्कचे चित्रीकरण या दाम्पत्याने केले आहे.

Leave a Comment