‘एक था टायगर’ या सिनेमाला २०० कोटीच्या पुढे नेल्याने सध्या इंडस्ट्रीजमध्ये टायगर सलमान खानच्या नावाचा धबधबा आहे. त्यामुळेच सध्या सलमान सोबत काम करण्यासाठी सध्या बॉलीवूडमधील हिरोईनची लाईनच लागली आहे. आगामी काळात सलमानचा ‘किक’ हा सिनेमा येत असून यामध्ये अनुष्का शर्मा त्याच्या सोबत झळकणार असल्याचे समजते.
काही दिवसापुर्वीच सलमान सोबत आयटम सॉंग करून प्रीति झीटाने त्याचा फायदा करून घेतला आहे. ‘किक’ या सिनेमासाठी सुरुवातीला दीपिका पादुकोणचे नाव आघाडीवर होते. मात्र दीपिकाचे बीजी शेडूल व तिचा डेटचा प्रोब्लेम यामुळे हा सिनेमा अनुष्काच्या पदरात पडला असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून अनुष्का ही यशराज बॅनरच्या सिनेमाच्या शूट मध्ये बीजी आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दीपिका ही सध्या व्यस्त असल्याच्या कारणावरून सल्लूसाठी वेळ काढणार नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे दीपिकाने नकार दर्शविला तर हा सिनेमा अनुष्काला मिळणार आहे. त्यामुळे लवकरच आता सलमानमुळे अनुष्काचे नशीब उजळणार असे दिसते .