सोनाक्षी पडली सैफच्या प्रेमात

द्बंग सिनेमाच्या माध्यामातून लोकप्रिय ठरलेली सोनाक्षी सिन्हा बॉलीवूडचा नवाब सैफ अली खानच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे आता सर्वांनाच सोनक्षीमुळे गेल्या काही दिवसापासून लग्नाच्या तयारीत असलेल्या करीनाचा पत्ता साफ होणार की काय असा प्रश्न पडला असेल. तर तसे काही नसून सोनाक्षी आणि सैफ ‘बुलेट राजा’ या सिनेमात एकमेकावर प्रेम करणार आहेत.

दिग्दर्शक तिगमाशु धुलियाच्या या नवीन सिनेमामधून सैफ व सोनाक्षीची ऑन स्क्रीन केमेस्ट्री आता पाहवयास मिळणार आहे. उत्तरप्रदेशतील माफिया राजवर आधारित असा हा सिनेमा आहे. या सिनेमातून प्रथमच सोनक्षी हातात बंदूक घेतलेली पाहवयास मिळणार आहे. बऱ्याच दिवसानंतर सैफसुद्धा यामध्ये एका ग्रामीण युवकाचा रोलमध्ये दिसणार आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनाक्षी म्हणाली, ‘ ‘द्बंग’ आणि ‘रावडी राठोड’ या सिनेमासारखे यश ‘बुलेट राजा’ला मिळणार आहे. यामधील माझा रोल थोडसा हटके असल्याने फॅन्सना हा नवीन लूक नक्कीच आवडेल.’

‘द्बंग’ आणि ‘रावडी राठोड’ या सिनेमाच्या यशामुळे सोनाक्षीचे सिनेमा हिट ठरत असतना अक्षय कुमार सोबतच्या ‘जोकर’मुळे मात्र तिची थोडीसी निराशा झाली आहे. सध्या ती ‘सन ऑफ सरदार’ व ‘वन्स ऑपेन टाइम इन मुंबई-२’ या सिनेमाच्या शूट मध्ये व्यस्त आहे.

Leave a Comment