सलमानमुळे बदलणार का प्रीतिचे नशीब ?

बॉलीवूडमधील टायगर असलेल्या सलमान खान सोबत प्रत्येकाची काम करण्याची इच्छा असते. गेल्या काही दिवसापासून तो प्रत्येकासाठी लकी ठरत असल्याने त्याच्या सोबत काम केले तर स्टार होतो हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच प्रीति झिंटा तिच्या आगामी काळात येत असलेल्या ‘इश्क इन पेरिस’ मध्ये सलमान खान सोबत एका आयटम सॉंगवर थिरकणार आहे.

सध्या सलमानचे स्टार चमकत असल्याने सर्वांनाच त्याच्यासोबत काम करावे असे वाटत आहे. त्यामुळेच अभिनेत्री प्रीति झिंटाने या सिनेमात सलमान खान सोबत आयटम सॉंग करण्याचे ठरवलेले दिसते. प्रीतिचे करियर आयपीएल आणि नेस वाडिया यांच्यामुळे उतरतीला लागले होते. तिच्याकडे एकाही सिनेमाची ऑफर नसल्याने तिला स्वताचे प्रोडक्शन हाउस काढावे लागले आहे. या सिनेमात सलमान खानसोबत ती एका आयटम सॉंगवर थिरकणार आहे. त्यासोबतच सलमान सिनेमाच्या प्रमोशनसाठी सुद्धा प्रीतिची मदत करणार आहे.

यापूर्वी सलमान व प्रीतीने एकत्रित ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘जान-ए-मन’ व ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या सिनेमात काम केले आहे. त्यामुळे आता प्रीतिसाठी सलमान किती लकी ठरणार हे येणाऱ्या काळात समजेल.

Leave a Comment