दीपिका पदुकोनचा गुरु कोण ?

बॉलीवूडमधील नटखट व अवखळ अभिनेत्री म्हणून दीपका पदुकोणने स्वत:ची इंडस्ट्रीजमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण कोणाला ना कोणाला तरी गुरु मानून काम करीत असतो. गुरूच्या मदतीमुळेच प्रत्येकजण लाइफमध्ये सक्सेस होत असतो. त्यामुळेच दीपिका ही कोणाला गुरु मानत असेल असा प्रश्न सर्वानाच पडणे स्वाभाविक आहे. विशेषत: आज शिक्षकदिन असल्या कारणाने हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.

दीपिका ही तिचा गुरु वडील प्रकाश पदुकोण यांनाच मानते. ते प्रसिद्ध बैडमिटनपटू आहेत. दीपीका नेहमीच त्यांना गुरु मानून त्यांच्याकडून प्रेरणा घेत असते. नेहमीच पुढे जाण्यासाठी गुरु या नात्याने प्रकाशने तिला इंस्पायर केले आहे. आतापर्यत दीपिकाने घेतलेल्या प्रत्येक डिसिजनच्या पाठीमागे ते होते.

दीपिकाने कुठ्ल्या फिल्डमध्ये जावे यासाठी त्यांनी कधीच अट घातली नाही. पण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तिने स्वत:चे नाव मात्र उज्ज्वल करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न दीपिकाने प्रत्यक्षात साकारले आहे. आज दीपिकाने बॉलीवूडमध्ये तिची वेगळी क्रेझ निर्माण केली आहे. तिची गणना इंडस्ट्रीमधील टॉपच्या हिरोईनमध्ये केली जाते.