करीना-प्रियांकाची गळाभेट

बॉलीवूडमधील मंडळीचा यावर विश्वास बसणार नाही पण ही न्यूज खरी आहे. आतापर्यंत एकमेकींना पाण्यात पाहणाऱ्या बि टाउन मधील टॉपच्या नायिका करीना कपूर व प्रियंका चोप्राने त्यांच्यातील फार काळापासून ताणलेले संबध जुळवून घेतले आहेत. त्यामुळे या दोघीच्या संबधाना नेहमीच तडका देणाऱ्या मंडळीची मात्र निराशा झाली आहे.

काही दिवसापूर्वीच प्रियंका चोप्रा ही ‘हिरोईन’च्या सेटवर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना भेटण्यासाठी आली होती. मात्र त्याठिकाणी आल्यानंतर तिची भेट मधुरशी काही झाली नाही. त्याठिकाणी गेल्यानंतर करीना कपूर अचानक तिच्या समोर आली त्यामुळे तिची काही काळ भांबेरी उडाली. मात्र लगेचच प्रियांकाने स्मार्टपणा दाखवत ती करीनाकडे गेली व प्रेमाने तिची गळाभेट घेतली. त्यानंतर करीनाने पण तिचे हसतमुखाने स्वागत केले. यावेळी सेटवर उपस्थित असलेल्यांना तर वाटेल की दोन जुन्या मैत्रिणी बऱ्याच दिवसानंतर भेटल्या आहेत.

प्रियंका व करीना यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून वाद होते. विशेषता दोघीही शाहीद कपूरच्या काही काळ प्रेमिका राहिल्या आहेत. त्यामुळेच दोघीतील संबध बिघडले होते. त्यामुळे नेहमीच दोघीही एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करीत होत्या. आता करीना व प्रियंकाचे शाहीद कपूर पासून ब्रेकअप झाले आहे. त्यामुळेच या दोघीनी सध्या झाले गेले विसरून एकत्रित येण्याचे ठरविलेले दिसत आहे.

Leave a Comment