अमिताभ करणार ’द डर्टी पॉलिटिक्स ?

राजस्थानच्या राजकारणावर आधारित निर्माता-दिग्दर्शक के.सी. बोकाडिया ’द डर्टी पॉलिटिक्स’ नामक चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. यात मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत असून अमिताभ बच्चन यांना या चित्रपटात आणण्याची तयारी केली जात आहे.

याबाबत बोकाडीया यांनी सांगितले की, सध्या अमिताभ बच्चन यांच्याशी बोलणी सुरू आहेत. मल्लिकाबरोबर ’घाघरा में घमासान’ आणि ’तवे पर जवानी’ ही गीते चित्रित केली जातील. ही गाणी युवा वर्गात चांगलीच गाजतील.

बोकाडिया आणि अमिताभ या जोडीने १९९० मध्ये आज का अर्जुन आणि १९९९ मध्ये लाल बादशाह सारखे हिट चित्रपट दिले होते. आता अमिताभ बच्चन, ओमपुरी, अनुपम खेर, आशुतोष राणा, राजपाल यादव, मल्लिका शेरावत, गोविन्द नामदेव, सुशांत सिंह यांची ही राजकीय केमिस्ट्री कायवादळ निर्माण करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटाची शूटिंग जयपुरमध्ये १० सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होईल.

Leave a Comment