
पुणे: सांस्कृतिक राजधानीची बिरुदावली मोठ्या तोर्याने मिरविणार्या पुण्यात आता पार्टी संस्कृती अधिक फोफावत असल्याची धक्कादायक बाब वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या चिल्लर पार्टीच्या पाठोपाठ शनिवारी नगर रस्त्यावरील एका पबमध्ये आयटी प्रोफेशनल्सच्या हाय प्रोफ़ाईल पार्टीवर छापा घालून पुणे ग्रामीण पोलिसांनी ३०० जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा पब पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्याच्या मालकीचा असल्याची माहिती पुढे आली आहे.
