पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत तडजोड नाही: सुषमा स्वराज

मुंबई: कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी ठाम असून ही भूमिका सौम्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.

स्वराज यांनी रविवारी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी आपल्याशी संपर्क साधून; संसदेचे कामकाज चालू द्या; असे आवाहन केले. यावेळी आपण; कोळसा खाणींचे वाटप रद्द करा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; अशा दोन अटी त्यांच्यासमोर ठेवल्या. यावर मी लवकरच उत्तर देईन; असे सोनिया म्हणाल्या; अशी माहिती स्वराज यांनी दिली. याचा अर्थ आम्ही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी शिथील केली आहे; असा मुळीच होत नाही; असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात पंतप्रधान दोषी आहेत. नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा. मात्र ते राजीनामा देत नाहीत; म्हणून आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत; असे स्वराज यांनी स्पष्ट केले.

भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी देखील हीच भूमिका भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना अधोरेखित केली. पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment